पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील धुब्री जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीत २९ प्रवाशांना घेऊन जाणारी यांत्रिक बोट गुरुवारी उलटल्याने सात प्रवासी बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. या बोटीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह २९ प्रवासी होते. मात्र बोट उलटल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि राज्य आपत्कालीन परिस्थिती विभागाने घटनास्थळी धाव घेत २२ प्रवाशांना वाचविण्यात यश मिळवले. बेपत्ता असलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्राचारण करण्यात आले असून त्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे, असे धुब्री जिल्हा उपायुक्तांनी सांगितले. धुब्री शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भाशानीर परिसरात पुलाच्या वरील भागावर आदळल्याने ही यांत्रिक बोट उलटल्याचे त्यांनी सांगितले.

वाचवण्यात आलेल्या प्रवाशांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या बोटीवर किती शालेय विद्यार्थी होते याची अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी सर्व शालेय विद्यार्थ्यांना वाचविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बोटीमध्ये मंडळ अधिकारी संजू दास होते, जे बेपत्ता झाले आहेत. नदीकाठच्या धूपग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून दास हे भूमी अभिलेख अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यासह धुब्रीला परतत होते. भूमी अभिलेख अधिकारी आणि क्षेत्रीय मंडळ अधिकाऱ्याला वाचविण्यात आले असले तरी त्यांना मानसिक धक्का बसल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला