पीटीआय, गुवाहाटी : आसाममधील धुब्री जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीत २९ प्रवाशांना घेऊन जाणारी यांत्रिक बोट गुरुवारी उलटल्याने सात प्रवासी बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. या बोटीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह २९ प्रवासी होते. मात्र बोट उलटल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि राज्य आपत्कालीन परिस्थिती विभागाने घटनास्थळी धाव घेत २२ प्रवाशांना वाचविण्यात यश मिळवले. बेपत्ता असलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्राचारण करण्यात आले असून त्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे, असे धुब्री जिल्हा उपायुक्तांनी सांगितले. धुब्री शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भाशानीर परिसरात पुलाच्या वरील भागावर आदळल्याने ही यांत्रिक बोट उलटल्याचे त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in