Influencer Carol Acosta dies in US after choking On food : अमेरिकेती न्यूयॉर्क येथे कॅरोल अकोस्टा (Carol Acosta) या २७ वर्षीय बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएन्सरचा रेस्टॉरंटमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर जेवण करत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घशात घास अडकून गुदमरल्यामुळे सोशल मीडियावर किलाडामेंटे (Killadamente) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅरोलचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळत आहे. तिच्या निधानाची माहिती तिची लहान बहीण खात्यान (Khatyan) हिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.
“मी तुझ्यावर प्रेम करते आणि कायम करत राहिन. मी देवाचे आभार व्यक्त करते की त्याने मला तुझ्यासारखं मोठं हृदय असलेली बहिण दिली. माझ्या बहिणीला शांती लाभो”. अशी पोस्ट तीने केली आहे. या दु:खद घटनेनंतर तिने अकोस्टाच्या चाहत्यांचेहीआणि तिच्या सोशल मीडिया फॉलेअर्सचे देखील आभार मानले आहेत.
अकोस्टाच्या कुटुंबियांनी देखील या घटनेनंतर अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली आहे. “३ जानेवारी रोजी किलाडामेंटे म्हणून ओळखली जाणाऱ्या आमच्या प्रिय कॅरोलचे निधन झाले. अकोस्टा गोन्झालेझ कुटुंब तिला ओळखणाऱ्या प्रत्येकाबरोबर आपले दु:ख शेअर करते.” तसेच या निवेदनात अकोस्टाने केलेल्या सामजिक कार्याबद्दल तिचे कौतुक करण्यात आले आहे. तिने आपल्या कामाच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जिवनावर प्रभाव टाकल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा>> “म्हणून मी केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा…
इंस्टाग्रामवर ६.७ मीलियन फॉलोअर्स असणाऱ्या किलाडामेंटेने आपली वेगळी ओळख तयार केली होती. ती फॅशन, लाइफस्टाइल आणि मातृत्व यासंबंधी व्हिडीओ तयार करत असे. ती आपल्या दैनंदिन अडचणी आणि संघर्ष आपल्या फॉलोअर्सबरोबर शेअर करत असे. याबरोबरच तिने आपल्या नैराश्य आणि चिंता याविरोधातील लढा देखील अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता.