सागरी प्रदेशात गस्त घालण्यासाठी बोईंग कंपनीचे चौथे पी-८आय हे टेहळणी विमान भारतीय नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाला अशाप्रकारची आठ विमाने पुरविण्यासाठी भारतीय नौदल आणि बोईंग कंपनीदरम्यान करार करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने काही चाचण्या घेण्यात आल्यानंतर हे विमान भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होईल. भारतीय सागरी क्षेत्राचा विचार करता बोईंग कंपनीच्या या टेहळणी विमानामध्ये विशिष्ट प्रकारची प्रणाली (सिस्टीम्स) बसविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ पी 8-आय विमानांपैकी चार विमाने भारताच्या सुपूर्त करण्यात आले आहेत. बोईंग, भारतीय नौदल यांचे हे खूप मोठे यश आहे. एकंदरच बोईंगसाठी हा एक मैलाचा दगड आहे असे बोईंगचे भारतामधील उपाध्यक्ष डेनिस स्वॅन्सन यांनी सांगितले.
नौदलाच्या ताफ्यात बोईंगचे चौथे टेहळणी विमान दाखल
सागरी प्रदेशात गस्त घालण्यासाठी बोईंग कंपनीचे चौथे पी-८आय हे टेहळणी विमान भारतीय नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
First published on: 24-05-2014 at 04:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boeing delivers 4th p 8i maritime patrol plane to india