‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी ‘बोको हराम’ या नायजेरियातील संघटनेने युती केली असून त्याबाबतचा ध्वनिसंदेश ऑनलाईन जारी करण्यात आला. दरम्यान, ईशान्य नायजेरियात बोको हरामच्या कारवाया सुरू असून तेथे तीन बॉम्बस्फोटात ५८ जण ठार झाले आहेत.
इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी याचा उल्लेख करून बोको हरामचा नेता अबू बकर शेकाऊ याने सांगितले की, आम्ही मुस्लीम खलीफ अब्न अवाद इब्न इब्राहिम अल हुसैनी अल कुरेशी यांच्याशी हातमिळवणी करीत आहोत. आठ मिनिटांच्या ध्वनी फितीत शेकाऊ कुठेच दिसत नाही. ट्विटर खात्यावर बोको हरामने ही ध्वनिफीत टाकली असून त्यात इंग्रजी, फ्रेंच व अरेबिक भाषेत त्याचा संदेश रूपांतरितही केला आहे.
शेकाऊ याने यापूर्वीही व्हिडिओ संदेशात अल बगदादी याचे नाव घेतले होते, पण त्यांच्याशी युती करण्याचे तो बोलला नव्हता. नायजेरियन अतिरेक्यांनी आतापर्यंत १३ हजार बळी घेतले असून १५ लाख लोकांना बेघर केले आहे. शेकाऊ याने गेल्या वर्षी बोरनो राज्यातील ग्वोझा शहर ताब्यात घेऊन तो खिलाफतीचा भाग असल्याचे जाहीर केले होते, पण अलिकडे बोको हराम संघटना इसिसच्या मार्गाने दहशतवादी प्रचार करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा