अमेरिकेत उभारण्यात येणाऱ्या प्रति मादाम तुसॉँ संग्रहालयात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, ऋतिक रोशन आणि करिना कपूर या पाच कलाकारांच्या मेणांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची सुरुवात मंगळवारपासून होणार असून ते ३१ डिसेंबपर्यंत चालणार असल्याची माहिती संग्रहालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या  उद्घाटनप्रसंगी पारंपरिक आणि आधुनिक भारतीय नृत्याचे एकत्रीकरण असलेला कार्यक्रमही सादर करण्यात येणार असल्याचे संग्रहालयाने स्पष्ट केले.

Story img Loader