गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळय़ा घालून हत्या केली. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात असतानाच हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी अतिकला संपवून आत्मसमर्पण केलं, पोलिसांनी तिगांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिक आणि अशर्रफ या दोन भावांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात असताना काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. अतिक माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देण्यास सुरुवात करणार इतक्यात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करीत असल्याचे दृश्य अनेक माध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपलं आहे.

अतिकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते

अतिक आणि अशर्रफवरील गोळीबारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने दोघांचेही मृतदेह घटनास्थळावरून हलवले. २००५ मधील उमेश पाल हत्येप्रकरणी दोन्ही भाऊ दोघेही अटकेत आहेत. अतिकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते. उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपी असलेला अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे गुरुवारी झाशी येथे पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिक आणि त्याचा भाऊ अशर्रफ या दोघांना उमेश पाल हत्याप्रकरणात पोलीस न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट विश्लेषक कमाल आर. खानने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने तीन ट्वीट्स करून त्याचं मत मांडलं आहे. पहिल्या ट्विटमध्ये कमालने म्हटलं आहे की, पहिल्या दिवसापासून अतिक सर्वोच्च न्यायालयात सांगत होता की, उत्तर प्रदेशमध्ये त्याची हत्या केली जाऊ शकते. त्याचवेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला अतिकला सुरक्षा प्रदान करण्याबाबत आश्वस्त केलं होतं. आता या हत्येनंतर सर्वोच्च न्यायालय काय पावलं उचलतं हे पाहावं लागेल. सर्वोच्च न्यायालय आता स्वतःचं महत्त्व कसं कायम राखेल?

हे ही वाचा >> Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…

कमाल आर खानने ट्विटरवर अतिकच्या हत्येसंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच त्याने या हत्येवरील भाजपा नेते सुरेश कुमार यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kamaal r khan reaction on atiq ahmed killing asc
Show comments