कराची येथील पाकिस्तानच्या हवाई तळाजवळ मंगळवारी सायंकाळी ग्रेनेडहल्ला करण्यात आला. समाजकंटकांनी या वेळी या तळाजवळ दोन हातबॉम्ब फेकले. यात एक जण जखमी झाल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
शहरा-ए-फैसल या उड्डाणपुलावरील हवाई तळाजवळ मंगळवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पुलावरून जाणारा एक पादचारी जखमी झाला. त्याला जिना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे हा हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळांना लक्ष्य करण्याची दहशतवाद्यांची ही या वर्षांतील पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीही हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते. पाकची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागल्याची भीतीही दरवर्षी व्यक्त करण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा