अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका शाळेत आज सकाळी बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्यापतरी कोणत्याही संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

हेही वाचा – न्यायाधीश, पोलिसांवर हल्ल्याचा ‘पीएफआय’चा कट

पश्चिम काबूलमधील दश्त-ए-बर्ची येथे एका शाळेत काही विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. यावेळी मोठा स्फोट झाला. यात १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून २७ जणं जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी खालिद जद्रान यांनी दिली आहे.

दरम्यान, सुरक्षा पथके घटनास्थळी पोहोचली असून हल्ल्याचे स्वरूप आणि मृतांचा तपशील आम्ही नंतर जाहीर करू, अशी प्रतिक्रिया गृह मंत्रालयाचे अब्दुल नाफी टाकोर यांनी दिली. तसेच “नागरी वस्तीवर हल्ला करणे हे अमानवीय असून या घटनेचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – रशिया आज युक्रेनचा लचका तोडणार!; सार्वमत घेतलेल्या चार प्रदेशांच्या विलीनीकरणाची घोषणा

गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर दोन दशकांपासून सुरू असलेल्या युद्धाचा अंत झाला होता. त्यानंतर हिंसाचाराच्या घटनेत लक्षणीय घट झाली होती. मात्र, अलिकडच्या काही महिन्यांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. या महिन्यात २३ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका मशिदीजवळ हा स्फोट झाला होता. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्यापूर्वी हेरात शहराजवळील मशिदीतही स्फोट झाला होता.

Story img Loader