फरुखाबाद रेल्वे स्थानकात सापडलेला बॉम्ब निकामी करण्यात आल्यामुळे एक मोठा संभाव्य अपघात टळला, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक ‘बॉम्बसदृश वस्तू’ फलाट क्रमांक एकवर पडून असल्याची माहिती शासकीय रेल्वे पोलिसांच्या गस्ती पथकाने आम्हाला दिल्यानंतर आम्ही कानपूरमधील लष्करी अधिकारी व बॉम्बनाशक पथकाशी संपर्क साधला. हा फलाट रिकामा करण्यात येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ाही थांबवण्यात आल्या. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मैनपुरी पॅसेंजर सुटण्याच्या काही वेळ आधी, म्हणजे ६.२० वाजता स्फोट होण्यासाठी या बॉम्बला टायमर लावले होते, असे बॉम्बनाशक पथकाने सांगितले.

मात्र, टायमरमध्ये काही बिघाड निर्माण झाल्यामुळे हा बॉम्ब फुटला नाही. या प्रकरणी तपास केल्यानंतरच अधिक माहिती देता येईल, असे पथकाचे प्रमुख एम. के. पांडे म्हणाले.

लखनौ शहराजवळील महाराजगंजनजीक रेल्वेमार्गाचा ५० सेंटिमीटरचा भाग तुटलेला असल्याचे प्रयाग- लखनौ पॅसेंजरच्या चालकाच्या दक्षतेमुळे लक्षात आल्याने तेथे मोठा रेल्वे अपघात टळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेमागे घातपाताची शक्यता पडताळून पाहण्यासाठी तिच्या विभागीय चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत.