ईशान्य नायजेरियातील माइदुगरी शहरातील आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार झाले असून इतर २८ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बोर्नो राज्याचे पोलीस आयुक्त अडेरेमी ओपाडोकुन यांनी सांगितले की, अलहाजी हारूना मशिदीजवळ एका प्रगत स्फोटकाचा वापर करून आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. यात २६ जण ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत.

Story img Loader