येथील आदिवासी पट्टय़ातील एका कोळशाच्या खाणीत गॅसचा मोठा स्फोट होऊन सात खाण कामगार ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. येथील डोली भागात असलेल्या कोळशाच्या खाणीत हा स्फोट झाल्याची माहिती ओराकझाई संस्थेने दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या स्फोटात काही जण जखमीही झाले आहेत. दुर्घटनेत मरण पावलेले कामगार हे खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील स्वात व शांगला जिल्ह्य़ातील आहेत. स्फोटाची माहिती मिळताच स्थानीय रहिवाशांनी खाणीत जाऊन जखमी व मृत कामगारांना बाहेर काढले.

Story img Loader