डमडम लष्करी छावणीनजीक एका पिशवीत ठेवलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट होऊन दोन मुले जखमी झाली.
डमडम कॅन्टोनमेंटजवळील रेल्वे फाटकाजवळ ही पिशवी बेवारस स्थितीत ठेवण्यात आली होती. या ठिकाणी खेळणाऱ्या शफीक व शाहरुख या दोन मुलांनी पिशवीची चेन उघडली असता त्यात एक टिफिन ठेवलेला दिसला. त्यांनी टिफिन उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा स्फोट होऊन दोघेही जखमी झाले, असे रेल्वे पोलीस अधीक्षक देवाशीष बेग यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच बॉम्बनाशक पथक त्वरित घटनास्थळी पाठवण्यात आले, कारण या पिशवीत आणखी २ बॉम्ब होते.

Story img Loader