अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाले आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी शनिवारी रात्री हा स्फोट झाला. अल्पसंख्यांक शिया मुस्लिमांची या ठिकाणी नेहमी बैठक पार पडायचयी. सुन्नी मुस्लिम दहशतवादी गट ‘इस्लामिक स्टेट’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी हा स्फोट आपण घडवून आणल्याचा दावा केला आहे.

खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी आहेत. स्फोटानंतर तपास पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं, असं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये बसस्थानकाजवळ असणाऱ्या या ठिकाणी रुग्णवाहिका दिसत होत्या.

प्रेषित मोहम्मद यांचे नातू हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ पार पडणाऱ्या आशुरापूर्वी हा हल्ला करण्यात आला. याआधी शुक्रवारी इस्लामिक स्टेटने केलेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू आणि १८ जखमी झाले होते. अफगाणिस्तानमधील कोणत्याही ठिकाणी इस्लामिक स्टेटचं नियंत्रण नाही, मात्र स्लीपर सेलच्या माध्यमातून ते अल्पसंख्यांवर हल्ला करत आहेत.

Story img Loader