*  ११ पोलिसांसह १६ जखमी *  आयईडीचा वापर झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्नाटकची राजधानी बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटामुळे हादरली. भारतीय जनता पक्षाच्या बंगुळुरुमधील कार्यालयाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या स्फोटात ११ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. हा गाडीतील सिलिंडरचा स्फोट असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली, मात्र आयईडीच्या साहाय्यानेच तो घडविण्यात आल्याचे पोलिसांनी नंतर स्पष्ट केले.
कर्नाटकात पाच मे या दिवशी राज्य विधानसभेच्या निवडणुका होत असून त्या सुरळीत पार पडाव्यात यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस पथकातील काही पोलीस बंदोबस्ताची पाहाणी करण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी एक व्हॅन आणि एक कार यांच्या मध्ये उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकलवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात तीन महिला आणि ११ पोलिसांसह एकूण १६ जण जखमी झाले. या स्फोटामुळे दूर अंतरावरील इमारतींच्या खिडक्यांची तावदानेही फुटली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तीव्रतेवरून हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. अशोक यांनी सांगितले. आपला पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या स्फोटाची चौकशी केल्यानंतरच या मागे नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे स्पष्ट होऊ शकेल आणि त्यादृष्टीने राज्य सरकार सतत केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
विशेष म्हणजे, बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर २०१० मध्ये बाँबस्फोट करण्यात आला होता, तो ही १७ एप्रिल याच दिवशी. घटनास्थळी तातडीने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक दाखल झाले. बंगळुरूचे पोलीस आयुक्त राघवेंद्र औराडकर यांनी हा घातपाताचाच प्रकार असल्याचे सांगितले. तर राज्याचे पोलीस महासंचालक यांनी या हल्ल्यात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती दिली.
निवडणुका घोषित झालेल्या असल्यामुळे पक्ष कार्यालयातील वर्दळ वाढली होती, किंबहुना त्यावेळी कार्यालयात राज्याचे पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते उपस्थित असण्याची शक्यताही होती. आणि त्यांना लक्ष्य करूनच हा स्फोट घडविला गेला, असा आरोप भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आला.