पाटण्यातील गांधी मैदानात मंगळवारी आणखी एक जिवंत बॉम्ब मिळाल्याने खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तो निकामी केला. दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी सहा बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये सहा जण मृत्युमुखी पडले होते.
गांधी मैदानावर संशयित वस्तू असल्याचे समजल्यावर त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये तो बॉम्ब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने तो निकामी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक जयंत कांत यांनी सांगितले. या बॉम्बची क्षमता किती होती, याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, गांधी मैदानावर सर्वच वस्तूंची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader