फिलीपाइन्समध्ये आलेल्या बोफा वादळातील बळींची संख्या ४७५ वर गेली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना या भीषण वादळाचा फटका बसला आहे. या वादळातून सावरण्यासाठी फिलीपाइन्स सरकारने आंतरराष्ट्रीय मदत मागविली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  मंगळवार- बुधवारी या वादळाने मिंडानाओ बेटानजीकची शहरे उद्ध्वस्त केली. त्यानंतर आलेल्या पुरामुळे भूस्खलनाच्या असंख्य घटना घडल्या. शेकडो कुटुंबे या पुरामध्ये वाहून गेली. मृतांची संख्या ४७५ वर गेली आहे. ३७७ नागरिक बेपत्ता असल्याचे लष्कराने स्पष्ट केले. सुमारे दोन लाख नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यात अडचणी येत. सर्व मूलभूत सुविधा कोलमडून गेल्या आहेत. पुरांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये न्यू बाटान येथील गरीब स्थलांतरितांचा समावेश सर्वाधिक आहे. एकटय़ा मिंडानाओ भागात २५८ मृतदेह सापडल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा