प्रसिद्ध टेनिसपटू आणि माजी विम्बल्डन विजेता बॉरिस बेकरला न्यायालयाने अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दिवाळखोरी जाहीर करताना संपत्ती आणि कर्जाची माहिती लपवल्याप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने हा निर्णय देताना यापूर्वी सुधारणेसाठी दिलेल्या संधीकडे बोरिस बेकरने लक्ष न दिल्याचंही निरिक्षण नोंदवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

६ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राहिलेल्या ५४ वर्षीय बॉरिस बेकरला दिवाळखोरी कायद्यानुसार ४ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलंय. यापूर्वी बेकरला एकूण २० गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. यात ट्रॉफी आणि मेडल्स हस्तांतरित करण्याशी संबंधित ९ प्रकरणांचाही समावेश आहे. जून २०१७ मध्ये बॉरिस बेकरला दिवाळखोर घोषित केल्यानंतर त्याच्या स्पेनमधील मलोर्काच्या संपत्तीवर घेतलेलं ३ मिलियनचं कर्ज बुडालं. याच प्रकरणी न्यायालयाने कठोर ताशेरे ओढत बेकरला शिक्षा सुनावली.

विशेष म्हणजे न्यायालयाने यावेळी बॉरिस बेकरच्या २००२ मधील एका प्रकरणाचाही उल्लेख केला. हे प्रकरण जर्मनीमधील होतं. न्यायालय म्हटलं, “बॉरिस बेकरला २००२ मधील जर्मनीतील प्रकरणात इशारा आणि सुधारणेची संधी देऊनही उपयोग झाला नाही. यानंतरही बेकरने दिवाळखोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये स्वतःचा दोष मान्य केला नाही. त्यामुळे त्याचा अपमान हा या प्रकरणातील प्रक्रियेचा भाग आहे. आता या प्रकरणात कोणतीही नम्रता नसेल.”

नेमकं प्रकरण काय?

बॉरिस बेकरला स्पेनमधील कर्ज प्रकरणी दिवाळखोर घोषित केल्यानंतर त्याला त्याची सर्व संपत्ती जाहीर करणं बंधनकारक होतं. जेणेकरून विश्वस्त त्यांच्या संपत्तीचा उपयोग क रून कर्जदारांना त्यांचे पैसे परत करू शकतील. बेकरला दिवाळखोर घोषित केलं तेव्हा ही रक्कम जवळपास ५० मिलियन इतकी होती. मात्र, मागील महिन्यात झालेल्या सुनावणीत समोर आलेल्या पुराव्यांनुसार बेकरने आपल्या संपत्तीची आणि कर्जाची माहिती लपवल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा : खोदकामातील सोन्याची नाणी स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यात कापड व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

या प्रकरणी बेकरने जाणीवपूर्वक अप्रामाणिक वर्तन केल्याचाही ठपक ठेवण्यात आलाय. संपत्ती आणि कर्जाची संपूर्ण माहिती देणे बेकरची जबाबदारी असतानाही तो यासाठी इतरांकडे बोट दाखवत आहे, असाही आरोप सरकारी वकील रेबेका यांनी केलाय.