आंतराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत असल्याच्या मुद्यावरून मोदी यांनी पुन्हा एकदा यूपीए सरकावरला निशाण्यावर धरले. मोदी म्हणाले, “एकेकाळी भारतीय रुपयाचा जगभरात ‘आवाज’ होता, परंतु आज रुपयाने ‘आवाज’ गमावला आहे. रुपयाप्रमाणेच आपल्या पंतप्रधानांचा आवाजही आता ऐकू येत नाही”
तसेच “सध्या रुपया आणि पंतप्रधान हे दोघेही मुके झाले आहेत. आज रूपया दिवसेंदिवस घसरतो आहे आणि त्यावर तातडीने योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे. सलग दुसऱयांदा सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसांमध्ये महागाई कमी करू अशी आश्वासने यूपीएने केली होती त्याचे काय झाले?” असा सवालही मोदींनी उपस्थित केला. “रुपयाचे मूल्य सावरण्यापेक्षा उलट, आता रूपया आणि यूपीए या दोघांचेही मूल्य खालावलेले आहे. देशाला उध्वस्त होण्यापासून वाचविण्याची वेळ आता आली आहे. केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत आहे.” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.