प्रेयसीला भेटायला गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तिच्या कुटुंबियांनी खून केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे. हा तरुण भिमलपूर गावातील छट घाटावर रविवारी संध्याकाळी त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. यावेळी जमावाने मृत युवकाच्या मित्रालाही बेदम मारहाण केली. या जखमी युवकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कांती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीएमसी आमदाराच्या पत्नीला १ कोटींची लॉटरी; भाजपाकडून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, पश्चिम बंगालमध्ये नवा राजकीय वाद

मृत युवक निहाल हा मुझफ्फरपूरमधील हज्म तोली या भागातील रहिवासी होता. या युवकाचा मृतदेह कांती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल त्याच्या मित्रासोबत रविवारी संध्याकाळच्या सुमारास छट घाटावर पूजेदरम्यान गेला होता. सुर्यास्ताच्या वेळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. यावेळी निहालसोबत मुलीला बघताच तिच्या कुटुंबियांनी त्याच्यावर छेडछाड करण्याचा आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित लोकांनीही निहालला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.

गुजरातमधील दुर्घटना ताजी असतानाच कर्नाटकात पर्यटकांची हुल्लडबाजी; झुलत्या पुलावर थेट कार चालवली

निहालच्या कुटुंबियांनी रास्ता रोको करत आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे. पोलीस उपअधीक्षक राघव दयाल या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्याचं आश्वासन त्यांनी पीडिताच्या कुटुंबियांना दिलं आहे. दरम्यान, मुझफ्फरपूर जिल्ह्यातीलच परमजीवर गावातील छट घाटावर एका २१ वर्षीय युवकाचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ वादातून बुल्लू कुमार या युवकाचा त्याच्या मित्रानेच चाकू भोसकून खून केला आहे. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत आरोपीच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.