पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून मागील तीन महिन्यांमध्ये ५ कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमी नमो अगेन म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत वेगवगेळ्या वस्तू या अॅपवरून विकल्या जात आहेत. यामध्ये अगदी टी-शर्टपासून पेनपर्यंत अनेक नमो मर्चंडाइजचा समावेश आहे. एकीकडे तीन राज्यांमधील निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागलेला असताना दुसरीकडे ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेला नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद हा भाजपासाठी नक्कीच सकारात्मक आहे. ९० दिवसांमध्ये या अॅपवरून १५ लाख ७५ हजार वस्तू विकल्या गेल्या आहेत. जसजशी निवडणुक जवळ येईल तशी या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकताच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमो अॅपवरून सर्वाधिक खरेदी ही भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मागील महिन्यापासून पेटीएम आणि अॅमेझॉनसारख्या माध्यमातूनही ‘नमो’ ब्रॅण्डच्या वस्तू विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपाच्या काही खासदारांनी ‘नमो हुडी चॅलेंज’च्या नावाने नमो ब्रॅण्डचे हुडी घालून फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीसारख्या नेत्यांनी नमो ब्रॅण्डच्या वस्तू घेण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे नमो ब्रॅण्डच्या वस्तूंचा खप वाढल्याचे बोलले जात आहे. हिमाचल प्रदेशमधून भाजपाचे खासदार असलेल्या अनुराग ठाकूर आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना ‘नमो अगेन’ची टीशर्ट घालून ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत. ही नमो टी-शर्ट नमो अॅपवर ४९९ रुपयांना उपलब्ध आहेत. एकूण विक्री झालेल्या वस्तूंपैकी ५० टक्के टी-शर्टस आहेत.

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त नमो ब्रॅण्डच्या वस्तुंवर विशेष सेलअंतर्गत सवलत देण्यात आली होती. या काळामध्ये विकल्या गेलेल्या टी-शर्टमधून एकूण २ कोटी ६४ लाखांची कमाई झाली. टी-शर्टसबरोबरच ५६ लाखांच्या टोप्या, ४३ लाखांचे किचैन्स, ३७ लाखांचे कॉफी मग आणि ३२ लाखांच्या वह्या विकल्या गेल्या. तसेच नमो ब्रॅण्डच्या पेन विक्रीमधून ३८ लाखांची कमाई झाली.

काय सांगते आकडेवारी

एकूण विक्री झालेल्या गोष्टी – १५ लाख ७५ हजार

एकूण कमाई – ५ कोटी २० लाख

टी-शर्टच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – २ कोटी ६४ लाख ७३ हजार ३२१ रुपये

टोप्यांच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ५६ लाख २ हजार ८६५ रुपये

किचैन्सच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ४३ लाख ६ हजार ७३७ रुपये

कॉफी मगच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ३६ लाख ३८ हजार ८१८ रुपये

वह्यांच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ३२ लाख २० हजार ५८३ रुपये

पेनच्या विक्रीमधून झालेली एकूण कमाई – ३७ लाख ७३ हजार ८४३ रुपये