Brave Woman Stops Robbery: पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका महिलेचं कौतुक होत आहे. घरात शिरलेल्या तीन चोरांना या महिलेनं मोठ्या धाडसानं रोखून धरलं. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण या महिलेचं कौतुक करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण एक्स या सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. चेहऱ्याला मास्क लावलेले तीन चोर या घरात शिरतात. तेव्हा घरात महिला आणि तिची दोन लहान मुलं उपस्थित असल्याचं दिसत आहे. एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा त्याप्रमाणे महिला धाडस दाखवून न घाबरता चोरांना थोपवून ठेवते. व्हायरल होणारे तीनही व्हिडीओ खाली एम्बेड केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय आहे?

या घटनेतील महिला आपल्या घराच्या छतावर कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिला तीन चोर भिंत ओलांडून घरात शिरत असल्याचं दिसतं. तीनही चोरांनी तोंडावर मास्क लावला होता. हे पाहून महिला तातडीने खालच्या मजल्यावर जाते आणि मुख्य दरवाजा बंद करते. चोर दरवाजा तोडू नयेत यासाठी ती पूर्ण ताकदीनिशी दरवाजा बंद करून ठेवते. तिचे हे प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरवाज्याच्या समोर सोफा लावून ती दरवाजा घट्ट लावून ठेवते.

हे वाचा >> MS Dhoni: ‘त्याला हिरो बोलणं बंद करा’, १२०० किमी सायकलिंग करून आलेल्या चाहत्याकडं धोनीनं पाहिलंही नाही

पाहा व्हिडीओ –

हे प्रयत्न करत असताना महिला आपल्या मुलांनाही सतर्क करते. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना फोन करून याची माहिती देते. दरवाज्या जवळ सोफा लावल्यामुळे चोरांना दरवाजा उघडणे अवघड होते. त्यामुळे बराच वेळ वाया घालविल्यानंतर चोर तिथून काढता पाय घेतात.

हे ही वाचा >> सेक्सदरम्यान प्रेयसीला झाली दुखापत, प्रियकरानं हॉटेलमध्येच घालवला वेळ; अखेर मुलीचा जीव गेला

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता महिलेचं कौतुक होत आहे. तिच्या धाडसाबद्दल लोक कौतुक करत आहेत. तसेच तिच्या चाणाक्षबुद्धीमुळे तिने स्वतःचा आणि मुलांचा जीव वाचविला असल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर आता महिलेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brave woman foils robbery stops 3 people from entering home in amritsar video viral kvg