Brazil Plane Crash in Sao Paulo VIDEO : ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना झाली आहे. ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान या भागात कोसळलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनी ग्लोबोन्यूजने दिलं आहे. व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचं एटीआर-७२ हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी पावणे दोनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली आहे. साओ पाऊलो राज्य अग्निशमन दलाने समाजमाध्यमांद्वारे या वृत्ताची पुष्टी केली आहे. विमान ज्या भागात कोसळलं तिथे अग्निशमन दलाची पथकं व बचाव पथकं रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, एअरलाईन कंपनी वोपासने एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी विमान अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारूलहोसला जाणारं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या विमानात एकूण ५८ प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारीदेखील या विमानात होते. विमान कंपनीने निवेदन जारी केलं असलं तरी ही विमान दुर्घटना कशामुळे झाली ते अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

typhoon yagi hits vietnam close airport
चक्रीवादळामुळे व्हिएतनाममध्ये विमानतळे बंद करण्याचे आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Indigo Flight Video Viral
धक्कादायक! विमान हवेत जाताच लोक बेशुद्ध झाले; इंडिगोच्या विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
iaf Sukhoi fighter plane
नवी मुंबई: डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिले उड्डाण ‘सुखोई’चे, तीन दिवसांपासून धावपट्टीच्या विविध चाचण्या
SpiceJet Flight Delayed
SpiceJet Delayed : “मी रात्रभर थरथरत कापत होते”, स्पाईसजेट विमानाला १२ तास उशीर, मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची गैरसोय!
Indigo flight, emergency landing, bomb threat, Nagpur airport, Jabalpur to Hyderabad Flight, bomb squad, passenger evacuation, security check, airport alert
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, नागपुरात इमर्जन्सी लॅण्डिंग
vistara to merge into air india on november 12
‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबरला विलीनीकरण
kandahar hijack 1999
Netflix’s IC 814: The Kandahar Hijack : भारताला हादरवून टाकणाऱ्या विमान अपहरणाची कहाणी

हे ही वाचा >> SC on Mumbai College Hijab Ban: मुंबईतील महाविद्यालयाच्या हिजाब बंदीला स्थगिती; ‘टिळा, टिकलीला परवानगी का?’, सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

अपघाताचं कारण काय?

दुपारी १.३० च्या सुमारास विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. काही वेळाने थेट विमान कोसळल्याची माहिती मिळाली. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, विमानात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाजही आला होता.

हे ही वाचा >> Serial Killer Arrested: १४ महिन्यांत ९ महिलांचा खून करणाऱ्या सिरीयल किलरला अखेर अटक; वेब सीरीजच्या कथेप्रमाणे आहे शोधमोहिमेचा थरार

ब्राझीलच्या अध्यक्षांकडून श्रद्धांजली अर्पण

ग्लोबोन्यूजने एका रहिवासी भागाजवळ पेटलेलं विमान कोसळत असल्याचा एक व्हिडीओ जारी केला आहे. व्हिडीओत दिसतंय की जंगल असलेल्या भागात विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन काळा धूर सर्वत्र पसरला. दरम्यान, दक्षिण ब्राझीलमधील एका कार्यक्रमात ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी या विमान अपघाताचं वृत्त सांगत शोक व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमातून त्यांनी विमान अपघातात दगावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी उपस्थित लोकांना उभे राहून एक मिनिट मौन पाळण्यास सांगितलं.