ब्राझील सरकारने भारतीय लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकसोबतचा ३२ कोटी डॉलर्सचा लस खरेदी करार स्थगित केला आहे. ब्राझीलने भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनचे २० मिलियन डोस खरेदी करण्यासाठी करार केला होता. या करारमुळे भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटलं असून, राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो वादात सापडण्याची चिन्हं आहेत. ब्राझीलने भारत बायोटेकसोबत केलेल्या लस खरेदी करारात भ्रष्टचार झाल्याचा आरोप ‘व्हिसलब्लोअर’नी केला आहे. सरकारकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं, मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर आता हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात गेला असून, ब्राझील सरकारने या खरेदी कराराला स्थगिती दिली आहे. असं असलं तरी पुढे हा करार रद्द करण्यात आला, तर भारत बायोटेकला ३२ कोटी डॉलर्सचा फटका बसू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना लसीकरणाला वेग देण्यासाठी ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबत कोव्हॅक्सिन खरेदीसंदर्भात एक करार केला. ब्राझील सरकार २० मिलियन डोस खरेदी करणार असून, ३२ कोटी डॉलर्सची ही डील आहे. मात्र, करोना परिस्थिती हाताळणीवरून आधीच टीकेचे धनी ठरलेले राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो या या लस खरेदी करारामुळे वादात सापडले आहेत. ब्राझीलमधील ‘व्हिसलब्लोअर’नी या करारावरून सरकारला लक्ष्य केलं. भारत बायोटेकसोबत करण्यात आलेल्या लस खरेदी व्यवहारात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याची माहिती बोल्सोनारो यांनाही असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

हेही वाचा- अकार्यक्षमतेची किंमत… करोनाच्या बळींच्या संख्येत ब्राझील जगात दुसऱ्या स्थानी

व्हिसलब्लोअरकडून उचलण्यात आलेल्या मुद्द्यावरून ब्राझीलमध्ये सरकारविरोधात टीकेचा सूर उमटत आहे. सरकारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले, मात्र व्हिसलब्लोअरचं समाधान करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यानंतर हे प्रकरण आता ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर ब्राझील सरकारने लस खरेदी कराराला स्थगिती दिली. ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपाची चौकशी केली जाणार असून, चौकशी होईपर्यंत लस खरेदी करार स्थगित करण्यात आला आहे, असं मार्सेलो म्हणाले.

हेही वाचा- नवसंजीवनी! हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार; म्हणाले,…

या व्यवहाराबद्दल ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केलं आहे. केंद्रीय महानियंत्रकांनी केलेल्या प्राथमिक चौकशी या व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, तरीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोग्य मंत्रालयाने हा लस खरेदी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

लस खरेदी व्यवहाराबद्दल नेमका आरोप काय?

ब्राझील सरकारने भारत बायोटेककडून लस खरेदी करण्यासाठी करार केला. भारत बायोटेककडून लस खरेदी हाच मूळ वादाचा विषय ठरला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल राष्ट्राध्यक्षी जाइर बोल्सोनारो यांना माहिती होती, मात्र त्यांनी लस खरेदी करार थांबवला नाही. ज्यामुळे ब्राझीलला महागडी लस खरेदी करावी लागली. ब्राझीलकडे फायझरची लस खरेदी करण्याचा पर्याय होता. पण त्यांनी भारत बायोटेककडून महागडी लस खरेदी केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. लस खरेदी कराराबद्दल करण्यात आलेले हे आरोप सिद्ध झाले, तर बोल्सोनारो यांना पद गमवावं लागू शकतं, तर भारत बायोटेकला ३२ कोटी डॉलर्सचा फटका बसू शकतो.