आपल्या आई-वडिलांचा बदला घेण्यासाठी मुलानं मोठं होऊन पोलिस व्हावं आणि मारेकऱ्यांना शोधून टिपावं, असा कार्यक्रम बॉलिवूडच्या चित्रपटात अनेकदा पाहायला मिळतो. बदला घेण्याच्या अशा असंख्या कहाण्या चित्रपटातून पाहायला मिळतात. पण जेव्हा वास्तवात असे प्रसंग घडतात, तेव्हा आश्चर्य वाटतं. ब्राझिलमध्ये अशीच एक घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी लेक पोलीस झाली आणि २५ वर्षांनी तिनं वडिलांचा खून करणाऱ्याला शोधून अटक केली. या घटनेची बातमी सध्या जगभरात चर्चेत आहे. गिस्लेन सिल्वा डी ड्यूस असे या महिला पोलिसाचे नाव आहे.

१९९९ मध्ये झाली होती वडिलांची हत्या

उत्तर ब्रझिलमध्ये राहणारी गिस्लेन सिल्वा डी ड्यूस नऊ वर्षांची असताना १९९९ साली तिच्या वडिलांची हत्या झाली. एका बारमध्ये केवळ २० डॉलरवरून भांडण झालं आणि मारेकऱ्याने गिस्लेनच्या वडिलांवर गोळी झाडली. त्यानंतर त्यानेच वडिलांना रुग्णालयात दाखल केले आणि तिथून मग पळ काढला.

हे वाचा >> Ghaziabad Maid: “..म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती

गिस्लेनचे वडील ड्यूस हे एका सुपरमार्केटमध्ये काम करत होते. यावेळी तिथे सुपरमार्केटमध्ये सामान पुरविणारा रायमुंडो अल्वेस गोम्स नावाचा व्यक्ती आला. त्यांच्यात २० डॉलरच्या उसनवारीवरून भांडण झालं. ड्यूस यांनी शांततेत बोलण्याचा प्रयत्न केला. पण गोम्स काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. गोम्स सुपरमार्केटमधून तडकाफडकी निघून गेला आणि पिस्तूल घेऊन परतला. पिस्तूल घेऊन आल्यावर त्यने ड्यूस यांना गोळ्या घातल्या.

२०१३ साली गोम्सला अटक झाली आणि न्यायालयानं त्याला १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र गोम्सने शिक्षेला आव्हान दिले. २०१६ रोजी त्याचे अपील फेटाळण्यात आले. तसेच त्याच्या अटकेचे निर्देश देण्यात आले. मात्र तेव्हापासून गोम्स फरार होता आणि त्याचा काहीच ठावठिकाणा पोलिसांना लागला नव्हता.

हे ही वाचा >> तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा VIDEO होतोय VIRAL

आणि गिस्लेननं पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेतला

गोम्सला शोधून कोठडीत टाकण्याचा निर्णय गिस्लेनने लहानपणीच घेतला होता. १८ व्या वर्षी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या गिस्लेनने नंतर पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय घेतला. पोलीस दलात रुजू होऊन तिने विविध पदांवर काम केले. पण वडिलांच्या मारेकऱ्याला शोधण्याचा तिचा निर्धार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर तिची हत्या विभागात बदली झाली. त्यानंतर गिस्लेनने न थांबता गोम्सचा शोध सुरू केला. बराच शोध घेतल्यानंतर तिने २५ सप्टेंबर रोजी गोम्सला अटक करण्यात यश मिळवलं.

ब्राझिलमधील माध्यमांशी बोलताना गिस्लेननं सांगितलं, “मी जेव्हा पोलीस दलात आले, तेव्हापासून एकही दिवस स्वस्थ बसले नाही. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्याला तुरुंगात टाकल्याशिवाय मला शांती मिळणार नाही, हे मनोमन ठरवलं होतं.” हत्येच्या २५ वर्षांनंतर गिस्लेन आरोपी गोम्सच्या समोर होती. आता तो ६० वर्षांचा झाला आहे. यावेळी तुरुंगात त्याच्याशी बोलताना गिस्लेन म्हणाली की, माझ्यामुळेच तू आज इथे आहेस. आता तुला २५ वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल.

न्यायालयाने आरोपी गोम्सला १२ वर्षांची शिक्षा सुनावणी आहे.