पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. २ महिन्याच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती महागाईच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्या आहेत. करोना संकटात नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९९ रुपयांच्या पुढे गेले आहेत.तर बर्‍याच ठिकाणी ते १०४ रुपयांच्या जवळ पोहोचले. ४ मेपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमती १० वेळा वाढल्या आहेत. या महिन्यात केवळ पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.४६ आणि डिझेलच्या दरात २.७८ रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलमध्ये प्रतिलिटर २७ पैसे आणि डिझेलमध्ये २९ पैशांची वाढ झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज (गुरुवार) देशात सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मे महिन्यात प्रत्येक दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी झालेल्या वाढीमुळे किरकोळ इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे आणखी दर वाढण्याची शक्यता आहे.

मे महिन्यात झालेली इंधन दरवाढ

मंगळवारी क्रूडच्या किंमती मार्चमध्ये झालेल्या वाढीपेक्षा अधिक होत्या. १५ मार्चनंतर प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली होती. त्यानंतर काल वाढ झाली होती. पण आज किंमती स्थिर आहेत.

या दहा दिवसांच्या वाढीनंतर देशातील बर्‍याच राज्यात पेट्रोल १०० च्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किंमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली होती आणि कालच्या वाढीसह मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. मुंबईत आता एक लिटर पेट्रोलची किंमत ९९.१४ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.७१ रुपये आहे.

व्हॅट आणि फ्रेट शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये पेट्रोलवर सर्वाधिक मूल्य वर्धित कर (व्हॅट) लादला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०३.८० रुपये आणि ९६.३० रुपये प्रति लिटर विकले जात आहेत.

चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर

देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.