अनेक ठरलेली लग्न मोडलेली तुम्ही पाहिली असतील. बऱ्याचदा लग्नाचे विधी सुरू असताना मोडलेली लग्नदेखील तुम्ही पाहिली असतील. बऱ्याचदा हुंडा हे लग्न मोडण्यामागचं कारण असतं. पुरेसा हुंडा दिला नाही, दागिने दिले नाहीत किंवा नवरदेवाला गाडी मिळाली नाही किंवा दिलेली गाडी आवडली नाही म्हणून मुलाकडच्या लोकांनी अनेकदा लग्न मोडलेली आपण पाहिली आहे. परंतु उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका नवरीने दागिन्यांचं कारण पुढे करत लग्न मोडल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे.

नवरदेवाने कमी दागिने आणि खूप कमी भेटवस्तू आणल्या आहेत असं म्हणत एका नवरीने सात फेरे घेण्यास नकार दिला. त्यानंतर नवरदेव थेट पोलीस ठाण्यात गेल्याचं प्रकरण समोर आलं आहे. कानपूर देहातच्या सिकंदरा पोलीस ठाणे क्षेत्रातील एक विचित्र घटना समोर आली आहे. दागिने कमी आणल्यामुळे नवरी संतापली आणि तिने फेरे घेण्यास नकार दिला. परिणामी हे लग्न मोडलं, तसेच वऱ्हाड घरी परतलं.

Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
Fraud with a young woman Mumbai, lure of marriage,
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
talaq on mobile phone, Buldhana, Police constable,
बुलढाणा : मोबाईलवर तीनदा तलाक म्हणत दिला घटस्फोट! पोलीस हवालदाराचे विवाहबाह्य संबंध…

कानपूर देहातमधल्या बनवारी गावातील रहिवासी असलेल्या श्याम नारायण यांच्या मुलीचं मानपूर गावातील लाला राम यांच्या मुलाशी लग्न ठरलं होतं. या लग्नात कोणत्याही प्रकारचा हुंडा घेतला जाणार नाही असं ठरलं होतं. त्यानंतर २९ एप्रिल रोजी वऱ्हाड दारात आल्यावर मुलीकडच्या लोकांनी वऱ्हाडाचं स्वागत कलं. त्यानंतर द्वारपूजा आणि जयमाला विधी झाले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. परंतु रात्री नवरीने अचानक लग्नास नकार दिला.

काय म्हणाली नवरी?

त्यानंतर मुलाकडच्या मंडळींनी नवरीची मनधरणी सुरू केली. परंतु नवरी म्हणाली, “इतके कमी दागिने घेऊन मी लग्न करणार नाही. तुम्ही दागिने आणि भेटवस्तू खूप कमी आणल्या आहेत. जर तुम्हाला हे लग्न हवं असेल तर आधी दागिने घेऊन या, अन्यथा वऱ्हाड घेऊन परत फिरा.”

हे ही वाचा >> सासूने सुनेला दोन प्रियकरांबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पकडलं, बेडरूमला बाहेरून कुलूप लावून…

नवरीच्या आक्रमक पवित्र्यानंतर नवरदेवाने पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर पोलिसांनीदेखील नवरीला समजावलं. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर नवरदेव वऱ्हाड घेऊन माघारी परतला. दरम्यान, एकीकडे हुंडा मागणाऱ्या मुलांवर कारवाई होते, अशा वेळी दागिन्यांसाठी लग्न मोडणाऱ्या या नवरीवर पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Story img Loader