बीजिंग : चीनच्या शान्झी प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल अंशत: कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला तर इतर ३१ जण बेपत्ता झाले. तर, सिचुआन प्रांतामध्ये मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामध्ये ३०पेक्षा अधिक बेपत्ता झाले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
शान्झी प्रांतामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अचानक पूर यामुळे जिंकियान नदीवरील पूल शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमाराला अंशत: कोसळला. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना १२ मृतदेह हाती लागले असून एकाची सुटका करण्यात यश आले आहे. त्याशिवाय १७ कार आणि आठ ट्रक नदीच्या पाण्यात कोसळले. त्यापैकी सात वाहने सापडली आहेत. बेपत्ता ३१ लोकांचा शोध सुरू आहे.सिचुआन प्रांतामधील झिन्हुआ गावात अचानक आलेल्या पुरामध्ये ३०पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले.
First published on: 21-07-2024 at 05:58 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridge collapse kills 12 in china amy