पीटीआय, पाटणा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिहारमधील सारण जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आणखी एक पूल कोसळला आहे. गेल्या पंधरवड्यात राज्यात पूल कोसळण्याची ही दहावी घटना आहे. गेल्या २४ तासांत सारणमधील पूल कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. बुधवारी सारण जिल्ह्यातील जनता बाजार परिसरात आणि लहलादपूर परिसरात दोन छोटे पूल कोसळले होते.
दरम्यान, पूल वारंवार कोसळण्याच्या घटनांनमागची कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी अमन समीर यांनी दिली. हा पूल गुरुवारी पहाटे कोसळल्याने जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले.
गंडकी नदीवरील हा पूल पंधरा वर्षांपूर्वी स्थानिकांनी वैयक्तिक निधीतून बांधण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूल कोसळण्याचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, नदीतील साफसफाईचे काम केल्यानंतर काठाजवळील कमी माती आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे पूल कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले. बनियापूर सरेया व सातुआ या दोन पंचायतींना जोडणारा हा पूल होता.
हेही वाचा >>>Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
सिवान, सारण, मधुबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांत एकूण दहा पूल कोसळले आहेत. स्थानिकांनी सांगितले की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
जनहित याचिका दाखल
बिहार सरकारला पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे अधिवक्ता ब्रजेश सिंग यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये राज्यातील पुलांची सुरक्षा आणि मजबुतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याबरोबरच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मापदंडानुसार पुलांवर देखरेख ठेवण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
तेजस्वी यादव यांचा आरोप
दरम्यान, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी १८ जूनपासून बिहारमध्ये १२ पूल कोसळल्याचा दावा केला आहे. बिहारमधील या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार दोघेही मौन बाळगून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुशासन दाव्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार कसा बोकाळला आहे, ते दिसून येत असल्याचा आरोप केला.