गोंडा : २०२४ची लोकसभा निवडणूक मी पुन्हा कैसरगंज मतदारसंघातूनच लढवणार असून, कुस्तीगिरांच्या आंदोलनाबाबत न्यायालयाच्या निकालाची मी वाट पाहात आहे, असे महिला कुस्तीगिरांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रविवारी सांगितले.

नरेंद्र मोदी सरकारला केंद्रात नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गोंडा जिल्ह्यातील बालपूर भागात सिंह यांनी एका सभेला संबोधित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, सिंह यांच्या अटकेसाठी सुरू असलेल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाचा कुठलाही थेट संदर्भ त्यांनी टाळला व त्याऐवजी आणीबाणी, राममंदिर, १९८४च्या शीखविरोधी दंगली यांसह इतर मुद्दय़ांवर काँग्रेसला लक्ष्य केले.

Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Compensation , Railways , Prajakta Gupte, Kalyan,
रेल्वे अपघातात मरण पावलेल्या कल्याणच्या प्राजक्ता गुप्तेना रेल्वेकडून आठ लाखाची भरपाई
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?
supriya sule News
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
High Court ordered fast tracking of Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : खटल्याची जलदगतीने सुनावणी घ्या आणि तो लवकरात लवकर निकाली काढा, उच्च न्यायालयाचे आदेश

तुम्ही कुस्तीगिरांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया का देत नाही आणि कशाची वाट पाहात आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मी न्यायालयाच्या निकालाची वाट पाहात आहे, असे उत्तर सिंह यांनी दिले. २०२४ची लोकसभा निवडणूक तुम्ही गोंडातून लढाल की अयोध्येतून, असे विचारले असता, मी कैसरगंजमधूनच लढेन असे ते म्हणाले. बृजभूषण सिंह यांनी कैसरगंज मतदारसंघाचे २००९ ते २०१४ असे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यापूर्वी ते बलरामपूर व गोंडा येथून विजयी झाले होते. लोकसभेचे खासदार म्हणून ते सहा वेळा निवडून आले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईची शक्यता असूनही सिंह हे आतापर्यंत बेपर्वा राहिलेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या संबंधात आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांची निवेदने नोंदवली असून ते १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करणार आहेत.

बृजभूषण हे लैंगिक छळांच्या पीडितांवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या प्रभावाचा वापर करत असून, त्यांना जबाब बदलण्यासाठी बळजबरी करत आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यां कुस्तीगिरांनी शनिवारी केला. सिंह यांच्यावर १५ जूनपर्यंत निर्णायक कारवाई न करण्यात आल्यास आपले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कारस्थानाचा आरोप

ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्याविरुद्धचे आरोप नाकारले असून, भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख म्हणून आपण केलेल्या सुधारणांमुळे आपली बदनामी करण्यासाठी हरियाणातील काही काँग्रेस नेत्यांनी कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader