दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात क्लोजर रिपोर्ट आणि चार्जशीट दाखल केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात मल्लांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात दोन न्यायालयांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली. पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीसंदर्भातला क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन महिला कुस्तीपटूचं लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही त्यामुळे POCSO अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत असं दिल्ली पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे. Live Law ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सात महिला कुस्तीगीरांनी २१ एप्रिल २०२३ रोजी दिल्ली पोलिसात बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २८ एप्रिलला बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन प्रकरणं नोंदवली होती. पहिलं प्रकरण ६ कुस्तीगीर महिलांच्या लैंगिक शोषणाचं होतं. तर दुसरं प्रकरण एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाचं होतं.

अल्पवयीन कुस्तीगीराने काय म्हटलं होतं?

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीगीर महिलेने हे जो जबाब दिला होता तो नंतर बदलला होता. सुरुवातीला तिने लैंगिक शोषण झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर तिने आपला जबाब बदलून तिने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी भेदभाव केल्याचा आरोप केला होता. या अल्पवयीन महिला कुस्तीगीराने मॅजिस्ट्रेटच्या समोर आधी लैंगिक शोषण झाल्याचं म्हटलं होतं. तर दुसऱ्यांदा जबाब नोंदवताना मी चिडून गेल्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र बृजभूषण शरण सिंह यांनी मला निवडलं नाही निवड करताना भेदभाव केला असं वक्तव्य करत आपला आधीचा आरोप मागे घेतला. मी डिप्रेशनमध्ये गेले होते असंही या महिला कुस्तीगीराने सांगितलं.

सहा महिला कुस्तीगीरांनी काय आरोप केले?

पहिली तक्रार: रेस्तराँमध्ये जेवण करत असताना ब्रिजभूषण यांनी मला त्यांच्या टेबलवर बोलवलं आणि मला चुकीचं वाटेल अशा पद्धतीने स्पर्श केला. त्यांच्या पायांनी माझ्या पायांना स्पर्श केला. तसंच माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावला.

दुसरी तक्रार : मी मॅटवर आडवी पडले होते. त्यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह माझ्याजवळ आले. ते माझे कोच नव्हते. पण त्यांनी माझी संमती न घेता माझा टी शर्ट वर केला आणि माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावला. फेडरेशनच्या ऑफिसमध्ये मी माझ्या भावाला घेऊन गेले होते. तिथे माझ्या भावाला बाहेर थांबायला सांगितलं आणि मला ऑफिसमध्ये बोलवलं. त्यानंतर आपल्याजवळ ओढलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

तिसरी तक्रार : ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मला माझ्या आई वडिलांना फोन करायला सांगितलं. माझ्याकडे मोबाइल नव्हता. त्यानंतर मला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या बेडजवळ बोलवलं ते तिथे बसले होते. त्यानंतर माझी संमती न घेता मला मिठी मारली तसंच माझ्याशी गैरवर्तन केलं.

चौथी तक्रार : ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मला त्यांच्या जवळ बोलवलं. माझा टी शर्ट खेचला माझ्या पोटाला हात लावला आणि श्वास चेक करण्यासाठी माझ्या नाभीवरुन हात फिरवला.

पाचवी तक्रार: मी रांगेत उभी होती. त्यावेळी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर मी दूर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला खांद्याला पकडलं

सहावी तक्रार : फोटो दाखवण्याच्या बहाण्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला.