गेल्या पाच महिन्यांपासून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेले आंदोलन कुस्तीगीरांनी अखेर मागे घेतलं आहे. साक्षी मलिक हिने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यावरून कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी मला कोणतीही टिप्पणी आता करायची नाही. न्यायालय याप्रकरणी योग्य काम करेल”, इतकीच प्रतिक्रिया ब्रिजभूषण यांनी दिली. न्यूज २४ ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटू पाच महिन्यांपासून आंदोलन करत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा >> ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन मागे; साक्षी मलिक ट्वीट करत म्हणाली, “आता…”

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन आता थांबवण्यात आले आहे. ट्वीट करत साक्षी मलिक म्हणाली की, “कुस्तीपटूंची ७ जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत १५ जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरु राहिल.”

“कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्तीसंघाची ११ जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकाराने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू,” असेही साक्षी मलिकने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan sharan singh reaction after wrestlers call off their protest in jantar mantar sgk
Show comments