‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही खेळाडूंनी केला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात जंतरमंतरवर आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्ती संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या खेळाडूंच्या या आंदोलनाबाबत बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “आज क्रिकेटपटू शांत का आहेत? त्यांना कसली भीती आहे?” कुस्तीपटू विनेश फोगाटचा उद्विग्न सवाल!

बृजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले?

बृजभूषण सिंह यांनी एका कवितेद्वारे या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मित्रांनो, ज्या दिवशी मी माझ्या आयुष्याचा आढावा घेईन, त्यादिवशी मी काय गमावलं अन् काय कमावलं. हे कळेल. जर मला वाटलं की माझी लढण्याची क्षमता संपली आहे आणि मी असहाय्य झालो आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल. असं जीवन जगण्यापेक्षा मृत्यू जवळ करणं मला आवडेल, असं ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: “लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं हे…”, महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले आहेत. याप्रकरणी २८ एप्रिलरोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brijbhushan singh reaction on allegations of women wrestlers spb