कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपाने धर्मांतरविरोधी कायदा आणला आहे. प्रलोभनातून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं होतं. यातच आता भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी इतर धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंसाठी घर वापसी मोहीम वाढवली आहे. “ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली पाहिजे आणि प्रत्येक मंदिर आणि मठाने हिंदूंची घरवापसी हेच लक्ष्य निश्चित केले पाहिजे,” असं ते म्हणाले.

“हिंदूंसमोर फक्त एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेलेल्या सर्व लोकांची घरवापसी करणे. हे आपोआप नैसर्गिकरित्या होणं शक्य नाही. त्यामुळे आपण पुढाकार घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या धर्मात गेलेल्या सर्वांना परत आणायलाचं हवं,” असं तेजस्वी सूर्या म्हणाले.  

कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायदा संमत..

“कोणत्याही व्यक्तीने चुकीचे वर्णन, बळजबरी, अवाजवी प्रभाव, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने, विवाहाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने व्यक्तीचे एका धर्मातून दुसर्‍या धर्मात धर्मांतर करू नये किंवा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोणताही कट रचू नये,” असे या कायद्यात नमूद केले आहे.

याआधी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारचा प्रस्तावित धर्मांतरविरोधी कायदा हा केवळ प्रलोभनातून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी असल्याचे सांगितले होते. “प्रस्तावित कायद्याचा कोणताही धर्म, त्यांच्या प्रथा आणि परंपरांवर परिणाम होणार नाही ज्याची संविधानात हमी देण्यात आली आहे,” बोम्मई म्हणाले होते.

Story img Loader