नरेंद्र मोदी यांना केंद्रात सत्तेवर आणल्यास जातीयवाद आणि भांडवलशाहीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल अशी टीका माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केली.
ब्रिगेड परेड मैदानावर डाव्या पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. डाव्या पक्षांच्या नेतृत्वात धर्मनिरपेक्ष आघाडीचाच पर्याय जनतेला दिलासा देईल असा दावा करात यांनी केला. मोदी यांनी डाव्या आघाडीची संभावना तिसऱ्या दर्जाची अशी केली होती. त्याचा करात यांनी समाचार घेतला. मोदी अजूनही पहिल्या इयत्तेत असल्याचा टोला  लगावला. गुजरातच्या विकासाच्या प्रारूपावरही करात यांनी टीकास्त्र सोडले. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसला भाववाढ आणि जातीयवाद रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करात यांनी केला. तसेच तृणमूल काँग्रेस भाजपबरोबर जाऊ शकते अशी टीका केली.

Story img Loader