ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आर्थिक आघाडीवर अपयश आल्यामुळे पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. अवघ्या ४४ दिवसातच त्यांना या पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यांच्या या राजीनाम्यानंतर ट्रस यांच्या मानधनाबाबत माहिती समोर आली आहे. लिझ यांना आयुष्यभरासाठी दरवर्षी १,१५,००० पौंड म्हणजेच १ कोटी पाच लाख रुपये मानधन मिळणार आहे. लिझ यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द अल्पकाळ ठरली असली तरी त्या सरकारच्या ‘सार्वजनिक कर्तव्य खर्च भत्ता’ या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. करदात्यांच्या पैशातून माजी पंतप्रधानांना हा भत्ता देण्यात येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस पायउतार ; अवघ्या ४५ दिवसांत कारकीर्द संपुष्टात; आर्थिक आघाडीवर अपयश आल्याने राजीनामा

पंतप्रधानांनी पदत्याग केल्यानंतर सार्वजनिक जीवनातील त्यांच्या विशेष स्थानामुळे त्यांना हे मानधन ब्रिटनच्या कायद्यानुसार दिलं जातं. या मानधनाला लिझ यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. ब्रिटनच्या राजकीय आणि आर्थिक उलथापालथीत त्यांची भूमिका पाहता त्यांनी या मानधनाला नकार द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

विश्लेषण: लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी कारकीर्द अल्पजीवी का ठरली? ट्रस यांच्यानंतर पंतप्रधानपदाची धुरा कुणाकडे?

“लिझ ट्रस यांच्याआधी पंतप्रधानपदावर काम केलेल्या व्यक्तींनी दोन वर्ष सेवा दिली. त्यामुळे लिझ ट्रस यांना त्यांच्या अल्प कारकिर्दीसाठी १,१५,००० पौंड मानधन देण्यात येऊ नये”, असे ‘लिबरल डेमोक्रॅट्स’च्या कॅबिनेट कार्यालयाच्या प्रवक्त्या क्रिस्टीन जर्डिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ट्रस यांची कारकीर्द आर्थिक आपत्ती आहे, असेही जर्डीन म्हणाल्या आहेत.

Liz Truss Resigns: …तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक थेट ब्रिटनच्या पंतप्रधानपदी होतील विराजमान

ट्रस यांनी सत्तेत येताच केलेल्या करकपातीच्या घोषणेनंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था हादरली होती. त्यामुळे त्यांना आधी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी करावी लागली. नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी ट्रस यांचे सर्व निर्णय केराच्या टोपलीत टाकले. तेव्हाच ट्रस यांची कारकीर्द अल्पजीवी ठरणार, हे स्पष्ट झाले होते. “जे आश्वासन देऊन मी निवडून आले होते, ते पूर्ण करता आले नाही. त्यामुळे मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. राजे चार्ल्स यांना याबाबत माहिती दिली असून नवा पंतप्रधान निवडला जाईपर्यंत मी पद सांभाळणार आहे”, असे ट्रस यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Britain prime minister liz truss is eligible for the public duty costs allowance of 115000 pounds a year for the rest of her life rvs
Show comments