भारतातले ब्रिटनचे राजदूत अ‍ॅलेक्स एलिस यांना त्यांची हिंदी भाषा सुधारायची आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना काही चित्रपटांची नावं सुचवण्यास सांगितलं आहे, जे चित्रपट पाहून त्यांची भाषा आणखी उत्तम होईल. तसेच त्यांनी स्वतः तीन चित्रपटांची एक छोटी यादी तयार केली आहे. ही यादी त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. परंतु हे करत असताना त्यांनी एक चूक केली. ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची टर उडवली जाऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलिस यांनी तीन चित्रपटांच्या यादित सर्वात आधी ‘शोले’ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांनी ‘शोले’चं स्पेलिंग चुकून ‘छोले’ लिहिलं. मग सोशल मीडियावरच्या लोकांना गंमत करायला आयती संधीच मिळाली. काहींनी एलिस यांची टर उडवली तर काहींनी त्यांची चूक निदर्शनास आणून दिली.

एलिस यांच्या ट्विटवर कमेंट करून काही युजर्सनी सवाल केला की, “सर तुम्ही छोले-कुल्चे, छोले-भुटरेंबद्दल बोलताय का?” काही युजर्सनी त्यांना ‘शोले’ पाहता पाहता छोले खाण्याचा सल्ला दिला आहे. ब्रिटीश राजदूतांना त्यांची चूक उमगल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी शोले चित्रपटाच्या नावाचं स्पेलिंग दुरूस्त करून लिहलं, तसेच त्यांनी स्वतःची गंमत करत म्हटलं की, “अजून मी नाश्ता केलेला नाही.”

हे ही वाचा >> “उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी…”; बाळासाहेबांवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

“मी सहकाऱ्यांना नेहमी म्हणतो, दुगना लगान देना पडेगा.”

राजदूत एलिस यांनी ‘शोले’सह ‘चुपके चुपके’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हे चित्रपट पाहणार असल्याचं सांगितलं. गँग्स ऑफ वासेपूरबद्दल ते म्हणाले की, मला हिंसाचार आवडत नाही, पण मी हा चित्रपट बघेन. एलिस म्हणाले की, “मी लगान चित्रपट पाहिला आहे त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी म्हणतो, दुगना लगान देना पडेगा.”