अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे (कन्झर्व्हेटिव्ह) खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश माध्यम संस्था बीबीसीवर पक्षपाती वार्तांकन केल्याचे आरोप केले आहेत. खासदार बॉब यांनी ब्रिटनच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जगभरात चाललेल्या घडामोडींचा एक सभ्य आणि चांगला आढावा घेण्याचे काम बीबीसीने करायला हवे. मात्र बीबीसीच्या वार्तांकनात सांगितले गेले की, मशिदीला उध्वस्त करून त्याठिकाणी मंदिर बांधले गेले आहे. पण ते हे विसरले की, त्या जागेवर सुमारे दोन हजार वर्षांपासून मंदिर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्या राम मंदिर: २०० वर्षांहून अधिक अशा धार्मिक-सामाजिक वाटचालीची सांगता

खासदार बॉब ब्लॅकमन पुढे म्हणाले, “उत्तर प्रदेशच्या अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थानी मंदिर उभारले गेल्यामुळे जगभरातील हिंदूंनी आनंद व्यक्त केला होता. मात्र खेदाने हे सांगावे लागेल की, बीबीसीने वार्तांकन करत असताना मशिदीच्या पाडकामाचा उल्लेख अधिक केला. नक्कीच त्याठिकाणी मशीद होती. पण सुमारे दोन हजार वर्षांपासून त्याठिकाणी मंदिरही होते, हे विसरून कसे चालेल? तसेच मुस्लीम पक्षकारांना शहरातच पाच एकर जमीन देण्यात आलेली आहे, हेदेखील सत्य आहे”

खासदार बॉब ब्लॅकमन यांनी इतर खासदारांना आवाहन करताना म्हटले की, बीबीसीचे निःपक्षपाती धोरण आणि जगभरात चाललेल्या घडामोडींचे अचूक वार्तांकन होण्याबाबत संसदेत चर्चा केली पाहीजे. त्यासाठी सरकारने वेळ निश्चित करून द्यावा.

अयोध्या राम मंदिर: प्राणप्रतिष्ठा काय असते? काय सोहळा असतो आणि काय विधी असतात?

यानंतर बॉब ब्लॅकमन यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत खासदारांनी बीबीसीच्या वार्तांकनाबाबत आक्षेप नोंदविला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी हिंदूंच्या हक्कांचा समर्थक असल्याच्या भूमिकेतून मी सांगू इच्छितो की, या चुकीच्या वार्तांकनामुळे असंतोष निर्माण झालेला आहे. बीबीसीने निःपक्षपाती वार्तांकन करावे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British mp bob blackburn calls out bbcs biased coverage of ayodhya ram mandir kvg