ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देशाच्या परंपरेप्रमाणे एक प्रथा पाळणार आहेत. महाराज किंग चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ऋषी सुनक हे बिबलीकल बुक ऑफ कोलोसियनचा काही अंश वाचणार आहेत. आर्चबिशप ऑफ कँटरबरी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सुनक हे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान आहेत आणि ते हिंदू धर्म मानतात. असं असूनही ते ख्रिश्चन धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या या पुस्तकाचा काही अंश वाचणार आहेत. त्यामुळे विविध धर्मांबाबत असणारा त्यांचा आदर प्रतिबिंबित होणार आहे.
बिबलीकल बुक ऑफ कोलोसियनचा अंश का वाचणार आहेत सुनक?
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले असे पंतप्रधान आहेत जे हिंदू धर्म मानतात. बिबलीकल बुक ऑफ कोलोसियनचा काही अंश वाचण्याचं त्यांचं मुख्य कारण आहे की ते याद्वारे ख्रिश्चन धर्माचा सगळ्या धर्मांवर असलेला विश्वास पुढे नेण्याचं काम करणार आहेत. लँबेथ पॅलेस कँटरबरीच्या आर्कबिशप ऑफिसचे रेवरेंड जस्टिन वेल्बी यांनी हे सांगितलं की इतर धर्मावर श्रद्धा असलेली व्यक्ती पहिल्यांदा हे पुस्तक वाचत आहेत.
पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हे वाचन केल्यानंतर किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला हे पवित्र मानलं जाणारं भोजन करतील. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी युनायटेड किंग्डम सह इतर अनेक देशांमधले काही निवडक पाहुणे येणार आहेत.
किंग चार्ल्स थ्री यांच्या राज्याभिषेकाची थीम Called To Serve अशी आहे. देशात चालत आलेली परंपरा आणि याआधी सत्तेत असणारे सत्ताधीश यांच्या स्मरणार्थ एक विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात हिंदू, शीख, इस्लाम या धर्मांमधल्या ही काही निवडक आणि महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या जाणार आहेत.