राजकीय नेते निवडणूक जिंकण्यासाठी शक्य तितके सर्व  प्रयत्न करतात. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यादेखील याला अपवाद नाहीत. ब्रिटनमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचे ब्रिटनमधील पक्षांकडून सुरु आहेत. थेरेसा मे यांनी ब्रिटनमधील भारतीय मतदारांचा विचार करुन म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये थेरेसा मे यांनी साडी नेसलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये हिंदी गाण्याचा वापर करण्यात आला आहे. ‘दोस्तो, धन्यवाद शुक्रिया मेहेरबानी. अब फिर समय आया है साथ निभाने का, पिछले समय जो साथ निभाया उसका भी सलाम,’ असे शब्द असलेले गीत व्हिडिओमध्ये वापरण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये थेरेसा मे साडी नेसून मंदिरात जाताना दिसत आहेत. थेरेसा मे पुजेसाठी मंदिरात जात असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओला ‘थेरेसा के साथ’ असे नाव देण्यात आले आहे.

व्हिडिओची सुरुवात ब्रिटिश संसदेच्या दृश्यांनी होते. यानंतर ८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीची आठवण करुन दिली जाते. या व्हिडिओत थेरेसा मे भारतीय नेत्यांसोबत संवाद साधताना दिसतात. थेरेसा मे ज्यावेळी भारतात आल्या होत्या, त्यावेळेची दृश्ये या व्हिडिओमध्ये वापरण्यात आली आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून थेरेसा मे आणि त्यांचा हुजूर पक्ष ब्रिटनमधील भारतीयांना आकर्षित करण्याता दिसत आहे. थेरेसा मे यांचे भारतासोबत अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओतून करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये थेरेसा मे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटदेखील दाखवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी परदेशातील भारतीयांमध्ये लोकप्रिय असल्याने त्यांच्यासोबतच्या भेटीचे क्षण थेरेसा मे यांच्या पक्षाकडून व्हिडिओमध्ये वापरण्यात आले आहेत.