सध्या लिबियामध्ये ब्रिटीश फौजांकडून ‘आयसिस’च्या विरोधात एका अनोख्या हत्याराचा उपयोग होताना दिसत आहे. याठिकाणी ब्रिटीश फौजा चक्क बॉलीवूड चित्रपटांतील गाणी वाजवून दहशतवाद्यांना हैराण करत आहेत. संगीत हे इस्लामविरोधी असल्याचे मानणाऱ्या आयसिसला बॉलिवूडमधील गाण्यांमुळे ‘त्रास’ होईल, असा सल्ला पाकिस्तानमध्ये जन्म झालेल्या येथील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त ब्रिटनच्या ‘डेली मिरर’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
‘आयसिस’ने येथील सिर्ते शहरात शरिया कायदा लागू केला असून याठिकाणी पाश्चात्य आणि थिल्लर गोष्टी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा फतवा जारी केला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना जाणुनबुजून बॉलीवूड गाणी वाजवून लक्ष्य करण्यात येत आहे. लीबियातील सिर्ते शहर व १८५ किमीच्या किनारपट्टीच्या भागामधून इसिसला हुसकावून लावण्यासाठी ब्रिटनकडून लीबियन सैन्यास सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी सिर्ते शहराच्या चेकपोस्टवर गाड्या उभ्या करून पहाटेच्या वेळेत ब्रिटीश फौजांकडून जोरदार आवाजात बॉलीवूडची गाणी वाजवली जात असल्याचे ‘डेली मिरर’च्या वृत्तात म्हटले आहे. दहशतवाद्यांच्या मनोबलावर आघात करण्यासाठी ही युक्ती प्रभावी ठरत असल्याचे ब्रिटीश फौजांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा