लंडन येथील एका शाळेचे पाच माजी विद्यार्थी सीरिया व इराकमध्ये इसिससाठी लढताना मारले गेले आहेत. त्यात दोन भावांचा समावेश आहे.
‘द सोशालिस्ट एटन’ असे या शाळेचे नाव असून देशातील डाव्या विचाराच्या राजकारण्यांची मुले तिथे शिकतात. या शाळेची अजूनही काही मुले आघाडीवर लढत असावीत अशी शंका आहे. हॉलंड पार्क स्कूल या पश्चिम लंडनमधील शाळेचा एक मुलगा अजूनही इसिससाठी लढत असून एकाला इसिससाठी निधी दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे, असे ‘संडे टाइम्स’ने म्हटले आहे. ब्रिटनच्या सुरक्षा प्रमुखांच्या मते ब्रिटनमधील ५० लोक जिहादी संघर्षांत मारले गेले आहेत. जे माजी विद्यार्थी मारले गेले, त्यात फाटलम शलाकू, फालमूर शलाकू हे दोन भाऊ व मोहमंद नासेर यांचा समावेश आहे. १९५८ मध्ये सुरू झालेली ही शाळा असून शिक्षण प्रणालीसाठी ती नावाजली जाते. या शाळेला उत्कृष्टतेचा दर्जाही आहे.

Story img Loader