इंग्रजांमुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत प्रवेश मिळाला. अन्यथा त्यांना कोणत्याही शाळेत प्रवेश मिळत नव्हता, असा दावा बहुजन समाज पक्षाचे नेते धर्मवीर सिंह अशोक यांनी केला आहे. इंग्रजांनी भारतावर आणखी १०० वर्ष राज्य केले पाहिजे होते, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.

धर्मवीरसिंह अशोक यांनी गुरुवारी राजस्थानमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात संबोधित करतानाता धर्मवीरसिंह म्हणाले, इंग्रजांनी आणखी १०० वर्षे या देशावर राज्य केले पाहिजे होते.अनुसूचित जाती/जमाती आणि ओबीसी समाजाची अशी गळचेपी झाली नसती. त्यांना डावलण्यात आले नसते. इंग्रजांच्या काळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाची संधी मिळाली. अन्यथा कोणत्याही शाळेत बाबासाहेब आंबेडकर यांना प्रवेश दिला जात नव्हता, असा दावा धर्मवीरसिंह अशोक यांनी केला.

धर्मवीरसिंह अशोक यांच्या या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धर्मवीरसिंह अशोक हे बसपाचे राजस्थानमधील नेते आहेत. त्यांच्याकडे राजस्थानमधील पक्षाची धूरा असून बसपा राजस्थानमधील सर्व २०० जागा लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर धर्मवीरसिंह अशोक यांनी मेळावे आणि सभांचा धडाका लावला आहे. बुधवारी देखील त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. ‘२०१८ मध्ये राजस्थानमध्ये बसपाचीच सत्ता येणार. यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. केंद्रात आणि राज्यात बसपाची सत्ता असेल तरच दलित समाजासाठीच्या कायद्यांना बळ मिळेल, असा दावा त्यांनी केला होता.

Story img Loader