तेलंगणात यंदा विधानसभेचा रणसंग्राण रंगणार आहे. त्यासाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) भाजपा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. बीआरएसचे नेते आणि खम्मम मतदारसंघाचे माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर १८ जानेवारीला ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ आणि १७ जानेवारीला भाजपा राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीनंतर रेड्डी भाजपात प्रवेश करतील, असं सांगण्यात येत आहे. पण, रेड्डी यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही. रेड्डी यांनी भाजपात प्रवेश केल्यावर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हेही वाचा : “मी राहुल गांधीला मारून टाकलं, फक्त…”, हरियाणातील राहुल गांधींचं विधान चर्चेत
श्रीनिवास रेड्डी यांची सुरक्षेत कपात
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी खम्मम येथे एक पदायात्रा काढणार होते. या यात्रेतच श्रीनिवास रेड्डी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती होती. पण, काही कारणास्तव हा प्रवेश होऊ शकला नाही. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीत रेड्डी यांनी सांगितलं की, बीआरएस पक्षाशिवाय आपल्याला जनतेचा मोठा पाठिंबा आहे. रेड्डी यांच्या विधानानंतर त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती.
हेही वाचा : शत्रुघ्न सिन्हांकडून ‘भारत जोडो’ यात्रेची तुलना आडवाणींच्या ‘राम रथ’ यात्रेशी; म्हणाले, “अशी ऐतिहासिक…”
वायएसआरसीपी प्रदेशाध्यक्षही होते रेड्डी
२०१४ साली रेड्डी यांनी युवाजना श्रमिका रायतू काँग्रेस पार्टीकडून (वायएसआरसीपी) लोकसभेची निवडणूक लढवली होती. या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही ते राहिले होते. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते वाईएस राजशेखर रेड्डी यांच्याबरोबर रेड्डी यांचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. त्यामुळे रेड्डी हे वायएसआरसीपी प्रमुख वाईएस शर्मिला यांच्याबरोबर जाण्याची शक्यता होती. पण, २०१८ साली झालेल्या विधानसभा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसच्या उमेदवारांना रेड्डी यांनी समर्थन दिलं होतं.