ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यांनंतर बेपत्ता असलेल्या राघवेंद्र गणेश त्या दिवशी बेल्जियममधील मेट्रोमधून प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडील मोबाईलचे सिग्नल तपासल्यानंतर बेल्जियममधील मेट्रोपर्यंत त्यांचा माग निघत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी सांगितले. ब्रसेल्समधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून गणेश यांचा शोध घेण्यात येतो आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतो आहे, असेही सुषमा स्वराज यांनी सांगितले. राघवेंद्र गणेश हे मूळचे भारतातील बेंगळुरूमधील असून ते इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत.
दरम्यान, ब्रसेल्समध्ये बॉम्बस्फोट झालेल्या घटनास्थाळावरून १५ किलो दारुगोळा सापडला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. विमानतळावर विस्फोटक सामग्रीसह असलेला तिसरा संशयित पळाल्याचे फ्रेडल अधिवक्तयाने बुधवारी स्पष्ट केले. तिसरा मनुष्य विमानतळावर होता आणि त्याने त्याची बॉम्ब असलेली बॅग विमानतळावरच सोडल्याचे फ्रेडेरिक वॉन लू म्हणाले. संशयिताने काळी टोपी आणि पांढरा कोट चढवला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्याची ओळख अद्याप पटायची असून, त्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सापडलेल्या संशयितांमध्ये इब्राहिम अल बक्राउ आणि त्याचा भाऊ खालिदचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा