आयसिसने सीरियामध्ये तुरुंग रक्षक म्हणून ओलीस ठेवलेल्या अनेक फ्रेंच नागरिकांमध्ये ब्रसेल्स विमानतळावर आत्मघातकी बॉम्बहल्ला करणारा नजीम लाचरौई याचाही समावेश असल्याचे तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. एका सूत्राच्या सांगण्यानुसार, २०१३ व २०१४ साली सीरियातून अपहरण करण्यात आलेल्या चार फ्रेंच पत्रकारांनी ‘अबू इद्रिस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका रक्षकाची ओळख पटवली आहे. या चौघांपैकी निकोलस हेनिन या पत्रकाराने अबू इद्रिस हाच नजीम लाचरौई असल्याचे ‘अधिकृतरीत्या ओळखले आहे’, असे त्याच्या वकिलांनी फ्रेंच वृत्तपत्रांमधील याबाबतच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा