सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील टिंडीवाला गावाजवळ पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत आलेला संशयित ड्रोन रोखला. अंमली पदार्थ तस्करांचे गैरप्रकार थांबवण्यासाठी तत्काळ बीएसएफने कारवाई केली आहे. रविवारीही असाच ड्रोन पाडण्यात आला होता.

अंमली पदार्थांच्या तस्करांद्वारे वापरले जाणारे ड्रोन पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेपलीकडून येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी बीएसएफने पंजाबमधील अमृतसरमधील भरोपाल गावात चीननिर्मित क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त केले. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशासह ३३२३ किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेवर रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. तर, सोमवारीही अंमली पदार्थांची तस्करी करणारा संशयित ड्रोन रोखण्यात आला.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ban, laser light beam, Shirdi airport area,
शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Mahakumbh mela 2025 Drone Show fact check video
महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळेल डोळे दिपवणारा भव्य ‘ड्रोन शो’? व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ नेमका कुठला? सत्य जाणून तुम्हीही व्हाल हैराण

रविवारीच अशाच एका घटनेत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने पंजाबच्या अमृतसरमधील नेस्ता गावात एक ड्रोन जप्त केला. बीएसएफच्या म्हणण्यानुसार, अमृतसरमधील नेस्टा गावाच्या बाहेरून चीन निर्मित क्वाडकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

Story img Loader