भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांमध्ये शत्रुत्वाचं नातं असून कायमच तणाव पाहायला मिळतो. भारताच्या जवानांचा पाकिस्तानी तुरुंगात छळ असल्याचे गंभीर आरोपही अनेकदा झालेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. सीमा सुरक्षा दलाचा एक जवान सीमेवर गस्त घालत असताना चुकून धुक्यात भरकटत पाकिस्तानच्या सीमेत गेला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्याला पकडल्यानंतर पुन्हा भारतीय सैन्याकडे सोपवलं.

हा जवान अबोहर सेक्टरमधील जी. जी. बेसच्या बीएसएफच्या पोस्टवर तैनात होता. तो भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गस्त घालत असताना भरकटला. सकाळी साडेसहा वाजता गस्त घालत असताना धुक्याचं प्रमाण प्रचंड होतं. अशात समोर दिसत नसल्याने अंदाज लावत लावत हा जवान भारतीय सीमेतून कधी पाकिस्तानच्या सीमेत गेला हे त्याला कळालेच नाही, अशी माहिती सैन्य प्रवक्त्यांनी दिली.

हेही वाचा : पंजाबमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडले; ‘बीएसएफ’च्या महिला पथकाची कामगिरी

या घटनेनंतर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये दुपारी १,५० मिनिटांनी फ्लॅग मीटिंग झाली. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानाला भारताकडे सोपवलं.

Story img Loader