सीमा सुरक्षा दलातील एका जवानाने दोन वरिष्ठ अधिकाऱयांची हत्या करून एका सहकाऱयाला जखमी केल्याची घटना गुरुवारी आसाममधील धुबरी जिल्ह्यात घडली. संबंधित जवानाने स्वतः जवळील रिव्हॉल्व्हरने या सगळ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. त्याची प्रकृती चिंताजनक असून, या घटनेत जखमी झालेल्या जवानाला हवाई रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
प्रभाकर मिश्रा असे हल्ला केलेल्या जवानाचे नाव आहे. त्याने सुरुवातीला स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरने सहायक उप-निरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱयांवर गोळीबार केला. बाबूलाल आणि सुरेंदर अशी त्यांची नावे आहेत. या घटनेत जखमी झालेल्या जवानाचे नाव ओमप्रकाश आहे. तो सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
आसाममधील बांगलादेशाच्या सीमेजवळ ही घटना घडली. मिश्रा याने आपल्या वरिष्ठांवर का गोळीबार केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार; दोन ठार
सीमा सुरक्षा दलातील एका जवानाने दोन वरिष्ठ अधिकाऱयांची हत्या करून एका सहकाऱयाला जखमी केल्याची घटना गुरुवारी आसाममधील धुबरी जिल्ह्यात घडली.
First published on: 05-09-2013 at 04:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsf jawan on border duty kills two seniors