सीमा सुरक्षा दलातील एका जवानाने दोन वरिष्ठ अधिकाऱयांची हत्या करून एका सहकाऱयाला जखमी केल्याची घटना गुरुवारी आसाममधील धुबरी जिल्ह्यात घडली. संबंधित जवानाने स्वतः जवळील रिव्हॉल्व्हरने या सगळ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. त्याची प्रकृती चिंताजनक असून, या घटनेत जखमी झालेल्या जवानाला हवाई रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
प्रभाकर मिश्रा असे हल्ला केलेल्या जवानाचे नाव आहे. त्याने सुरुवातीला स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरने सहायक उप-निरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱयांवर गोळीबार केला. बाबूलाल आणि सुरेंदर अशी त्यांची नावे आहेत. या घटनेत जखमी झालेल्या जवानाचे नाव ओमप्रकाश आहे. तो सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
आसाममधील बांगलादेशाच्या सीमेजवळ ही घटना घडली. मिश्रा याने आपल्या वरिष्ठांवर का गोळीबार केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा